#INDvNZ : धवन न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेतून बाहेर

नवी दिल्ली : भारताचा आकम्रक सलामीवीर शिखर धवन दुखापतूमुळे न्यूझीलंड दौ-यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसन तर एकदिवसीय मालिकेसाठी पृथ्वी शाॅची निवड झाली आहे.

येत्या शुक्रवारी सुरू होणा-या पाच सामन्याच्या टी-२० मालिकेतून ३४ वर्षीय शिखर धवनला वगळण्यात आले आहे. बंगळुरू येथे तिस-या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहित शर्मासह लोकेश राहुल त्याच्या जागी फलंदाजीला आला होता.

त्याआधीही पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान फलंदाजी करताना पॅट कमिन्सचा बाऊन्सर त्याच्या बरगंड्यावर आदळला होता.

गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरूध्दच्या मर्यादित षटकांच्या संपूर्ण मालिकेत दुखापतीमुळेच धवनला खेळता आले नव्हते.

भारतीय एकदिवसीय संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, पृथ्वी शाॅ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव,शिवम दुबे, युझवेंद्द चहल, महमंद शमी,नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर,केदार जाधव.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here