काविरोधातील निदर्शने भीतीचा परिपाक : जंग

नवी दिल्ली : सुधारित नागरीकत्व कायद्याविरोधात (का) दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरू असणारी निदर्शने म्हणजे गेल्या पाच वर्षात अनुभवलेल्या भीतीचा परिपाक आहे, असे दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग म्हणाले.

मला वाटते गेली सहा वर्ष ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण आहे, असे मला वाटते. ही भीती काढून टाकण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने पावले उचलायला हवीत, असेही मला वाटते. या संदर्भात आंदोलक हे त्यांच्या वेशभूषेवरून ओळखता येतात, हे पंतप्रधानांचे वाक्‍य आहे. या पार्श्‍वभूमीवर या आंदोलनाला कशा पध्दतीने सरकार हाताळते ते पहावे लागेल. सरकारच्या सलग अनेक कृतींमुळे अल्पसंख्यांकांच्या मनात भीती तयार झाली असे जंग म्हणाले. ते एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

का, एनआरसी विरोधात सुरू झालेल्या निदर्शनांमुळे जनतेत राज्य घटनेबाबत जागृती झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मुस्लिमविरोधी अथवा अल्पसंख्यांकाविरोधी अशी प्रतिमा परवडणारी नाही. अशी प्रतिमा तयार झाली तर तर ती तुमचेच नुकसान करतात. भारत जा सर्व धर्मीयांनी बनलेला आहे. तुम्ही त्यातील एखाद्याला बाहेर काढून आम्ही त्याची काळजी घेऊ असे म्हणू शकत नाही. आम्ही या देशात एकत्र राहणार आणि मरणार आहोत, असे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here