लखनऊ- आयपीएल 2023 चा मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स असा सामना रंगत असून हा सामना लखनऊ येथील एकना स्टेडिअमवर खेळला जात आहे. प्लेऑफचा विचार करता हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लखनऊ संघाने 3 बाद 177 धावा केल्या आहे.
हा सामना जिंकण्यासाठी लखनऊने मुंबईसमोर 178 धावांचे लक्ष्य दिले आहे. स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने लखनऊसाठी 47 चेंडूत 89 धावांची अर्धशतकी खेळी खेळली आहे. आपल्या झंझावाती खेळीत स्टॉइनिसने 8 षटकार आणि 4 चौकार लगावले. तसेच कर्णधार कृणाल पांड्याने 42 चेंडूत 49 धावा केल्या आहेत तर मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने 2 आणि पियुष चावलाने 1 बळी घेतला आहे.