मुंबई – सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगले तापले असताना, सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक असं ट्विट करण्यात येतंय. निवडणुकी नंतर राज्यात कोणताही पक्ष सत्तास्थापन करू न शकल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अश्यातच मराठी कलाकारांकडून एकाचवेळी ट्विटरवर “#पुन्हानिवडणूक” असं ट्विट करण्यात आलं आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अकुंश चौधरी, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी सकाळी १०:३० ते ११ च्या दरम्यान #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत ट्विट केलं आहे. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे.
दरम्यान, एकच वेळी अशा प्रकारचं ट्विट केल्यामुळे काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला आहे. ‘मराठी कलाकारांचा याच्याशी काय संबंध? भाजपा आयटी सेलच्या माध्यमातून कलाकारांच्या मदतीने पुन्हा निवडणूक घेण्यासंदर्भातील हा हॅशटॅग चालवला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे’
भाजपाच्या आयटी सेलचा या कलाकारांशी काय संबंध आहे? याची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे. कोब्रापोस्ट ने या अगोदर बाॅलीवुडच्या कलाकारांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यात भाजपातर्फे राजकीय ट्विट करण्यासाठी पैसे आॅफर केले जाते हे स्पष्ट झाले आहे. https://t.co/2JwgrTAN0K
— Sachin Sawant (@sachin_inc) November 15, 2019
तसेच, सचिन सावंत यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंढे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे’. असं मुंढे यांनी म्हंटल आहे.
काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.@meSonalee @SaieTamhankar @imAnkkush @SIDDHARTH23OCT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 15, 2019
दरम्यान, असं असलं तरी काँग्रेसने आक्षेप घेण्याआधीच नेटकऱ्यांनीच कलाकारांना चांगले सुनावले आहे. #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वर झी टॉकीज वाहिनीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या ट्विटरवर वापरला जात असलेला #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग झी टॉकीज अथवा ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ कार्यक्रमाशी निगडित असल्याचे वृत्त चुकीचे असून #MFK2019 च्या वोटिंगविषयी आम्ही वेळोवेळी आमच्या अधिकृत हँडलवरून अपडेट्स देत राहू. धन्यवाद. #AaplaZeeTalkies
— Zee Talkies (@ZeeTalkies) November 15, 2019
हे कलाकार आहेत का पक्षाचे एजंट?ह्यांना ह्यांची जागा दाखवून दया ह्यांचा यापुढे एकही सिनेमा पाहू नका.#पुन्हानिवडणूक pic.twitter.com/3yDVswRHZ8
— चेतन (@chetanNavale1) November 15, 2019