अबब !! शेखरला तब्बल 1672 रुपयांना पडली 3 अंडी

मुंबई –अभिनेता राहुल बोस याला काही दिवासांपूर्वी अवघ्या 2 केळ्यांसाठी 442 रुपये मोजवे लागले होते. त्यानंतर आता असेच काहीसे म्युझिक कम्पोझर जोडी विशाल-शेखरचा जोडीदार शेखर रविजानी सोबतही घडले आहे. फक्त 3 उकडलेल्या अंड्यांसाठी शेखरला तब्बल 1672 रुपये मोजावे लागले. शेखरने या बिलाचा फोटो त्याच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला. त्याच्या या ट्विटची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

या बिलाचा फोटो शेखरने सोशल मीडियावर शेअर केला आणि याविषयीची पूर्ण माहिती सुद्धा शेअर केली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, या हॉटेलनं फक्त 3 उकडलेल्या अंड्यांसाठी तब्बल 1350 रुपये आणि टॅक्ससह 1672 रुपयांचं बिल दिलं आहे. सामान्य व्यक्तीसाठी ही किंमत खरंच हैराण करणारी आहे, पण शेखर सुद्धा हे बिल पाहून चकित झाला आहे.

या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिल, 3 अंड्यांच्या सफेद बलकासाठी 1672 रुपये? हे जरा जास्तच महाग खाण नाही आहे का? असा प्रश्न ही शेखरने विचारला आहे. तत्पूर्वी, अभिनेता राहुल बोस 2 केळ्यांसाठी 442 रुपये मोजवे लागले होते. तर टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडियन कीकूला एक कप चहा आणि एक कॅपचीनो कॉफीसाठी  78,650 रुपये मोजावे लागले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here