मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री श्वेता मेहेंदळे’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘श्वेता मेहेंदळे’कडे पाहिलं जातं.
View this post on Instagram
विविध धाटणीच्या भूमिका साकारत श्वेताने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. याच मालिकेत रेवती हे पात्र साकरणारी अभिनेत्री श्वेता मेहेंदळेने एका वेगळ्याच कारणाने आता चर्चेत आली आहे. नुकतंच श्वेता मेहेंदळेने एका नेटकऱ्याला चांगलेच सुनावले आहे.
श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे मत बिंदासपणे मांडत असते, तिला बाईक राईड करायला खूप आवडते आणि तिने नुकताच कोकण दौऱ्या केला असून बाईक राइडचे व्हिडिओ सोशलवर शेअर केले.
अशात तिने या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. यातील एका युजर्सने तिच्यावर टीका करत प्रतिक्रिया दिली की,’इंग्रज भारतातून जाताना ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी आपली औलाद म्हणून सोडून गेली”, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर श्वेताने “तुमचे हे विचार आहेत? आणि ही भाषा आहे?” असे म्हटले. व्हिडीओवरील एका कमेंटला तिने सडेतोड उत्तर दिले आहे. दरम्यान सध्या श्वेताची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.