मराठी अभिनेत्री ‘दीपाली सय्यद’ला बलात्काराची धमकी

मुंबई – मराठी सिनेश्रुष्टीतील लोप्रिय अभिनेत्री ‘दीपाली सय्यद’ला बलात्कार करण्याची आणि जिवेमारण्याची धमकी मिळाली आहे. गेल्या वर्षभरापासून दीपालीला हा आरोपी अश्या प्रकारची धमकी देत होता.

गेली एक वर्षे हा आरोपी दिपाली सय्यदला फोनवरून धमकावत होता. संदीप वाघ असं आरोपीचं नाव असून नगर जिल्ह्यातून त्याला अटक केलीये. सध्या संदीप पोलीस कोठडीत आहे.

2019 मध्ये नगरमध्ये दिपालीने पाणी प्रश्नावरून आंदोलन छेडलं होतं. तेव्हा संदीप वाघ याने दिपाली यांचा फोन नंबर मिळवला. आणि त्यानंतर तिला धमकीचे फोन करण्यास सुरुवात केली.

सतत फोन करत असल्याने दिपालीने संदीपचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या फोनवरून फोन करण्यास सुरुवात केली. अखेर दिपालीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.