नवी दिल्ली- मे महिन्यातही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेत घट झाली आहे. मे महिन्यात मनुफॅक्चरिंग क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक ( पर्चेसिंग मॅनेजर्स इन्डेक्स) 30.8 टक्के इतका मोजला गेला.
एप्रिल महिन्यात तर तो 27.4 टक्क्यावर गेला होता. हा निर्देशांक 50च्या वर असल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तो 50च्या कितीतरी खाली आहे. त्या अगोदर 32 महिने हा निर्देशांक 50च्या वर होता. आता अनलॉक सुरू झाल्यामुळे या क्षेत्रात हळूहळू सुधारणा होईल असे सांगण्यात येते.