मुंबई- लॉक डाऊनमुळे वाहन कंपन्याच्या विक्रीत मे महिन्यातही मोठी घट नोंदली गेली आहे. हिरो मोटो कॉर्प कंपनीच्या विक्रीत 82 टक्क्याची घट होउन या कंपनीची केवळ 1,12,632 इतकी वाहने विकली गेली.
आता कंपन्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर विक्रीही वाढण्याची शक्यता आहे. या महिन्यात महिंद्रा कंपनीच्या ट्रक्टर विक्रीत 2 टक्क्याची वाढ होऊन या महिन्यात कंपनीचे 24,017 ट्रॅक्टर विकले गेले. मात्र कंपनीच्या इतर वाहन विक्रीत मोठी घट नांदली गेली आहे. कंपनीची वाहन विक्री 79 टक्क्यानी कमी होऊन 9560 एवढी झाली आहे.
ह्युदाई कंपनीच्या वाहन विक्रीत 78 टक्क्याची घट होऊन या कंपनीची केवळ 12,583 इतकी वाहने विकली गेली. ईस्कोर्टस या कंपनीच्या ट्रक्टर विक्रीतही या महिन्यात 3.4 टक्क्याची घट होऊन या महिन्यात कंपनीचे 6594 ट्रॅक्टर विकले गेले.