भारताची गोळाफेकपटू मनप्रीत कौरवर चार वर्षांची बंदी

नवी दिल्ली – भारताची गोळाफेकपटू मनप्रीत कौरवर राष्ट्रिय आमली पदार्थ विरोधी संघटनेने चार वर्षांची बंदी घातली असून ही बंदी 20 जुलै 2017 पासून पुढे लागू झाली आहे.

याविषयी बोलताना नाडाचे अधिकारी नविन अग्रवाल म्हणाले की, 2017 साली मनप्रीतची चार वेळा डोपिंग चाचणी घेण्यात आली होती. या चारही वेळा तेने आमली पदार्थाचे सेवन केल्याचे अहवालात उघड झाले होते. त्यामुळे तिच्यावर ही बंदीची कारवाई केली गेली असून या कारवाई मुळे तिने 2017 साली भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कमावलेले सुवर्णपदक तिच्या कडून काढुन घेतले जाणार आहे. तसेच तिने या काळात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नोंदविलेले विक्रम देखील स्थगित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी 2017मध्ये पहिल्यांदा चीन येथे झालेल्या आशियाई ग्रॅण्डप्रिक्‍स स्पर्धेत तर, दुसऱ्यांदा फेडरेशन चषक स्पर्धेत. तिसऱ्यांदा आशियाई ऍथेलेटिक्‍स चॅम्पियनशीप स्पर्धा आणि चौथ्यांदा आंतर राज्यीय विजेतेपद स्पर्धे दरम्यान घेण्यात आलेल्य चाचण्यांमध्ये तीने आमली पदार्थ सेवन केल्याचे अढळुन आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.