Manoj Jarange Patil । वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या बैठकीत थेट मनोज जरांगे यांना जालन्यातून उमेदवारी देण्याची मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मनोज जरांगे यांना त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण मराठा समाजाने पाठींबा दिला होता.
मात्र सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन वेगळं आरक्षण जाहीर केलं यानंतर आता जरांगे यांच्या निवडणूक लढण्याचा मुद्दा थेट माविआच्या चर्चेत गाजल्याने सर्वांच्याचे लक्ष त्या दिशेने वेधले गेले. मनोज जरांगे पाटील यांनी या सर्व चर्चांवर आपली भूमिका मांडली ते म्हणाले,’सध्या माझं पूर्ण लक्ष हे मराठा आरक्षणावर आहे. राजकारण हा माझा मार्ग नाही. मराठ्यांची लेकरं मोठी व्हावी, यासाठी माझी झुंज चालू असल्याचं जरांगे यांनी म्हंटले आहे.’
अशात जर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढली तर यामुळे भाजप पक्षाचे टेन्शन वाढू शकते. जालन्यात जरांगे विरुद्ध दानवे असा सामना रंगल्यास रावसाहेब दानवे जरांगेंचा पराभव करतीस, असे भाजप नेते, केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे.
अशात प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन आणि आनंद आंबेडकरांच्या भेटीवरही त्यांनी मौन सोडले. माझा राजकीय मार्ग नाही, असे म्हणत जरागेंनी भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे जालन्यात जरांगे निवडणुकीला उभे राहिल्यास रावसाहेब दानवे त्यांचा पराभव करतील, असे केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जालन्यातून भाजप नेमकं कोणाला तिकीट देणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
DK Shivakumar । DK शिवकुमार बनले काँग्रेसचे ‘संकटमोचक’; हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले