Manoj Jarange on family । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद काही केल्या संपत नाही. त्यातच मनोज जरांगे हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. त्यातच ते आपल्या कुटुंबा पासून अनेक दिवस लांब राहिले आहेत. त्यावरून सध्या जरांगे भावुक झाल्याचे दिसले.
गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे कुटुंबाच्या फारसे संपर्कात नसल्याचे समोर आलंय. कारण, त्यांच्या मुलीची प्रकृती बरी नसल्याचीही माहिती जरांगे पाटलांना नव्हती. सध्या मुलीची प्रकृती सुधारली असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ही माहिती देताना जरांगे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले
माझ्या मुलीची प्रकृती बरी नव्हती Manoj Jarange on family ।
याविषयी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी, “माझ्या मुलीची प्रकृती बरी नव्हती. याची मला काहीच कल्पना नव्हती. पण आता तिची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे आज तिला भेटायला आलो आहे. उद्या आईला भेटायला जाणार आहे. तिचंही उद्या ऑपरेशन आहे. तेही मला माहीत नव्हतं. आज दिवसभर कार्यक्रमात होतो. त्यामुळे आता भेटायला आलो आहे.”असे त्यांनी सांगितले.
२४ तारीख निर्णायक असणार Manoj Jarange on family ।
तसेच मनोज जरांगे पाटलांनी २४ तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. त्यावर ते म्हणाले, “२४ तारीख निर्णायक असणार आहे. आता आम्हाला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. अन्याय किती दिवस सहन करणार? आमच्याच वाट्याला अन्याय का आला? तुम्ही अधिसूचना काढली असतानाही त्याचा अपमान झाला. समाजाला बरोबर घेऊन निर्णय घेतला जाईल.असे त्यांनी म्हटलं.
ही बातमी वाचा
“मला जेलमध्ये टाकण्यासाठी हिंमत लागते” – मनोज जरांगे
मनोज जरांगेंचे थेट फडणवीसांना ओपन चॅलेंज ; म्हणाले,”…तर ४८ पैकी एकही खासदार निवडून येऊ देणार नाही”