Manoj Jarange on Fadnavis । राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केले आहे. जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खटके उडताना दिसतायत. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना ओपन चॅलेंज दिले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा एकही खासदार निवडणूक येऊ देणार नसल्याचे म्हटलंय.
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. “काहीही झालं तरीही मी माझं इमान विकणार नाही. आपल्यातल्या काही हरा### अवलादी फोडल्या. आज मराठ्यांच्या अवलादी नसल्यासारखं काही लोक वागत आहेत. काही लाखांसाठी फुटून हे लोक विरोधात बोलत आहे. मी चुकीची बाजू लावून धरलेली नाही” असं म्हणत टीका केली.
देवेंद्र फडणवीसांना आव्हान Manoj Jarange on Fadnavis ।
देवेंद्र फडणवीसांना जाहीर सांगतो आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करणार आहात. पण मला जे करायचं ते पण मी करणार आहे. कुठलेही व्हिडीओ आणा, कसलेही रेकॉर्डिंग आणा मी आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. मी वडवणीतून तुम्हाला आव्हान देतो आहे. मला मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या ४८ पैकी एकही निवडून येऊ देणार नाही.
देवेंद्र फडणवीस खुनशी Manoj Jarange on Fadnavis ।
देवेंद्र फडवणीस यांच्यासारखा आणि खुनशी मंत्री मी पाहिला नाही. त्यांच्याकडून बोलणारे सात ते आठ आहेत. सत्ता येत असते जात असते, नका त्रास देऊ. माझी SIT चौकशी सुरू आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर होऊद्या. जमनेरचे टंबरेल गिरीश महाजन म्हणतो माझे खूप लाड केले अरे तूच आमचा चहा प्यायला आणि पोहे खाल्ले, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.