नागपूर – नागपूरच्या एम्स रुग्णालयात इंजेक्शन खरेदीमध्ये मोठी हेराफेरी होत असल्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ग्राहकांना इंजेक्शनचे पैसे द्यायला लावायचे आणि पुन्हा तीच इंजेक्शन दुकानात नेऊन ठेवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हॉस्पीटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआरआय करण्यासाठी तीन रुग्ण गेले. त्यावेळी तिघांनाही एक-एक इंजेक्शन खरेदी करायला सांगितले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे तीन इंजेक्शन खरेदी केली. पैसेही दिले आणि रुग्णालयात आले. त्यानंतर त्यांच्याकडून हे इंजेक्शन घेतली. मात्र दोन इंजेक्शन न फोडता परत दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले. तर एकच इंजेक्शन तीन रुग्णांना देण्यात आले.
हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांना दोन आरोपींना अटक केली आहे. दलालांच्या माध्यमातून हे इंजेक्शने परत खरेदी केले जायचे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची एम्स प्रशासनाने हकालपट्टी करत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.