पुणे : अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे वतीने “अग्निशमन आणि बचाव’ कार्यासाठी वापरण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन “पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन’ तज्ज्ञ सुफी पोरे यांचे हस्ते सोमवारी छत्रपती संभाजी उद्यानात करण्यात आले. हे प्रदर्शन 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
तसेच सप्ताहानिमित्त अग्निशमन दलातर्फे शहरात दलाच्या वाहनांची रॅली महात्मा फुले पेठेतील अग्निशमन केंद्राच्या मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आली. तेथून नेहरू रस्ता मार्गे मालधक्का चौक, शनिवार वाडा, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता, सारसबाग, मित्र मंडळ, शिवदर्शन, ट्रेझर पार्क, सातारा रस्ता, मार्केटयार्ड, डायसप्लॉट मार्गे पुन्हा फुले पेठेत या रॅलीची समाप्ती झाली.