भारतात कोणत्या पक्षाचा बँक बॅलन्स आहे सर्वाधिक 

नवी दिल्ली – सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमुळे उमेदवारांची किती संपत्ती हे बाहेर आले आहे. परंतु आता कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे, हे देखील समोर आले आहे.

  • मायावतींच्या बहुजन समाज पार्टीकडे (बसपा) देशातील इतर राजकीय पक्षांपेक्षा सर्वाधिक बँक बॅलन्स आहे. बसपाकडे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मिळून तब्बल 670 कोटी रुपये एवढी रोकड आहे.
  • तर दुसरीकडे अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टीकडे (सपा) तब्बल 471 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. विशेष म्हणजे, बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी हे दोन्ही पक्ष बँक बॅलन्स मध्ये भाजप आणि काँग्रेस पक्षच्या वरचढ आहेत.
  • या यादीत काँग्रेसकडे 196 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. तर तेलुगु देसम पार्टीकडे (टीडीपी) 107 कोटी रुपये इतका बँक बॅलन्स आहे.
  • यामध्ये भाजप शेवटच्या घरात असल्याचे दिसून येत आहे. सध्या भाजपकडे 82 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. 2017-18 मध्ये भाजपला तब्बल 1 हजार 27 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. परंतु, यातील सर्वाधिक पैसा जाहिराती बाजीवर उडवल्यामुळे पक्षाकडे 1027 कोटी रुपयांपैकी केवळ 82 कोटी रुपये शिल्लक आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.