पुणे – अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजानन गणपती मंदिरामधील दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यास मुंबई पोलिसांनी सराफ बाजारात पकडले. चोरट्याच्या शोधासाठी विश्रामबाग पोलिसांची एक व गुन्हे शाखेची दोन अशी तीन पथके रवाना झाली होती. पोलिसांची वेगवेगळी पथके शहरासह अन्य ठिकाणीही चोरट्याचा माग काढत होती.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी पोउनि लहामगे व अंमलदार चव्हाण, पो.ना.क्र.चव्हाण, वाडेकर, जाधव, महाजन, गुजर, खांडेकर यांचेसह पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना धनजी स्ट्रीट नाका, दागीना बाजार, मुंबई-2 या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आलेला अजय महावीर भुक्तर, (वय 19 वर्षे व्यवसाय-नाही, रा.ठि.घर क्र.174, सिध्दार्थ नगर, हिंगोली रेल्वे स्टेशन जवळ, हिंगोली )यास ताब्यात घेवून त्याचेकडून. रू.5,13,000/- चे किंमतीचे दागिने व रोख रक्कम रू 1,50,000/-अशी मालमत्ता हस्तगत करून नमुद आरोपीस पुणे पोलीसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती दिपक निकम (वरिष्ठ पोलीस निरिक्षक लो.टि मार्ग पोलीस ठाणे, मुंबई) यांनी दिली.