माळेगाव कारखान्याची मतमोजणी संशयाच्या भोवर्‍यात

मतमोजणीची वेळ होऊनही एक तासभर मतमोजणी रखडली

बारामती – माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीचे काम आज (दि. २४) बारामतीतील जयश्री गार्डन या ठिकाणी होणार आहे. मात्र ही मतमोजणी सुरु होण्याअगोदरच संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

यामध्ये मतमोजणीच्या ठिकाणी चार अनोळखी व्यक्ती आढळले असून, या व्यक्तींच्या ओळखपत्रावर त्यांचा फोटो देखील नाही. तसेच, निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही देखील नाही. त्यामुळे या चारही व्यक्ती बोगस ओळखपत्र वापरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

दरम्यान, याच पार्शवभूमीवर सदर मतमोजणी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मतमोजणीची वेळ होऊही माळेगांव साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी थांबली आहे.

‘जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत मतमोजणीला सुरुवात करू देणार नाही’, असा पवित्रा सरकार शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांनी घेतला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.