मालेगाव – कोरोनावर मात करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मालेगावने “हम होंगे कामयाब” अभियान राबवत १३ हाजांहून अधिक व्यक्तींना आर्सेनिक अल्बम – ३० औषधाचे मोफत वाटप केल्याची माहिती परिषदेचे मालेगाव विस्तारक सचिन लांबूटे यांनी दिली.
आयुष मंत्रालयातर्फे कोरोना प्रतिकारासाठी होमिओपॅथी औषध आर्सेनिक अल्बम – ३० ची शिफारस करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुरु असलेल्या कोरोना युद्धाला हातभार लावण्यासाठी अभाविपने आर्सेनिक अल्बम – ३० औषधाचे मोफत वाटप केले.
“हम होंगे कामयाब” या अभियानाअंतर्गत मागील १५ दिवसात मालेगाव शहर, नामपूर शहर, सटाणा शहरातील ४ वनवासी व भिल्ल वस्त्या, नगाव, मथुरपाडा, गिलाने या गावांमध्ये तब्बल २,६७२ एवढ्या घरांपर्यंत औषधाचे वाटप केले आहे. या अभियानात भाजपा गटनेते सुनील गायकवाड यांनी औषध पुरवले.” अशी माहितीही लांबूटे यांनी दिली.