मताधिक्य मोठ्या प्रमाणावर कमी
झाल्याने राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज
खंडाळा – कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद पंचवार्षिक निवडणूक 2023 चा निकाल सोमवारी लागला. एकूण 18 पैकी 1 जागा आधीच बिनविरोध झाल्याने 17 जागांसाठी उमेदवारांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने 17 पैकी 16 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला.
मात्र, दरवेळीच्या मताधिक्यात व यावेळी मताधिक्यात जमीन आसमान चा फरक पडल्याने राष्ट्रवादीला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे भाजप पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलमध्ये भाजप, काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट तसेच ठाकरे गट) असे सर्वजण एकत्र येऊन जोरदार लढत दिली. मात्र, त्यांना एका जागेवर समाधान मानावे लागले, हमाल व तोलारी संघातून विश्वासराव शिरतोडे हे शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी देविदास मिसाळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश चव्हाण व निरीक्षक म्हणून प्रभारी तहसीलदार चेतन मोरे यांनी निवडणूक निकाल प्रक्रिया पार पाडली.
विजयानंतर शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजय जल्लोष साजरा केला. आमदार मकरंद पाटील यांनीही सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसेच विरोधकांविषयी कोणत्याही प्रकारची वाईट टिपा-टिपणी करू नका अशाही सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आमदार पाटील म्हणाले की आम्ही तिघे सख्खे भाऊ एकजूट राहतोय हे विरोधकांना डोळ्यात खुपते कारण हे भाऊ – भाऊ कसे आहेत हे सर्वांना माहीतच आहे असा टोला आमदार मकरंद पाटलांनी आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता लगावला.
विजयी उमेदवार व मतांची यादी खालील प्रमाणे
-विजय उमेदवार मते
-सोसायटी मतदारसंघ
-सर्वसाधारण
चव्हाण यशवंत श्रीरंग ३०३
धायगुडे नारायण दादासो ३१४
धायगुडे भगवान तात्याबा ३२६
यादव भानुदास दगडू ३३०
राऊत सिद्धेश्वर दत्तात्रेय ३३१
शेडगे शिवाजी दादा ३१९
शेळके सुनील संपत ३३९
महिला राखीव
घाडगे वैशाली चंद्रकांत ३४६
मांढरे उज्वला दिनकर ३४०
इतर मागास वर्ग
नेवसे राजेंद्र यशवंत ३३७
विजा / भज / विमाप्र
धायगुडे विजय मारुती ३५८
ग्रामपंचायत मतदार संघ
सर्वसाधारण
देशमुख संग्राम आप्पासाहेब २७५
धायगुडे साहेबराव किसन २४३
अनुसूचित जाती / जमाती
कदम संजय अर्जुन २९३
_______
व्यापारी मतदारसंघ
गालींदे अरुण गोविंदराव १८२
शहा जयेश सुरेशचंद्र १५५
हमाल व तोलारी
शिरतोडे विश्वासराव सदाशिव १८२
_______
लोणंद बाजार समितीवर राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व आहे मात्र त्यांचे या वेळचे घटलेले मतदान पाहता आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक रोमांचक ठरणार आहे.