Mahmood Ali Slaps Guard Video Viral : तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली (Mahmood Ali) यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावली आहे. त्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महमूद अली (Mahmood Ali) हे तेलंगणाचे पशूसंवर्धन मंत्री श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी क्षुल्लक कारणावरून त्यांच्या अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली आहे. त्यांच्या या कृत्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे.
गृहमंत्री महमूद अली (Mahmood Ali) यांनी श्रीनिवास यादव यांना मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुष्पगुच्छ घेण्यासाठी ते त्यांच्या अंगरक्षकाकडे वळले आणि त्याच्या दिशेने हात केला. तेवढ्यात अंगरक्षक त्यांच्याजवळ आला. अंगरक्षकाच्या हातात पुष्पगुच्छ नसल्याने महमूद संतापले आणि त्यांनी अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
BRS నాయకుడికి ఉండాల్సిన మొట్ట మొదటి లక్షణం ‘అహంకారం‘..
మంత్రి బర్త్ డేల పూల గుత్తి జల్దీ ఇయ్యలేదని గన్ మ్యాన్ ని చెంప మీద కొట్టిన మహమూద్ అలీ.. అదే, మన రాష్ట్ర హోమ్ మంత్రి అనుకుంట !
I strongly condemn the reported incident of Telangana’s Home Minister @mahmoodalibrs slapping a… pic.twitter.com/8tulQCcx6P
— Arvind Dharmapuri (@Arvindharmapuri) October 6, 2023
एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार हा व्हिडीओ ६ ऑक्टोबरचा आहे. टी. श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेलेल्या महमूद अली (Mahmood Ali) यांना त्यांच्या अंगरक्षकाने पुष्पगुच्छ वेळेत दिला नाही, म्हणून त्यांनी अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली. तर श्रीनिवास यादव यांनी महमूद यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. याबाबत महमूद अली (Mahmood Ali) यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याशी बातचीत होऊ शकली नाही.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. यावर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहेत. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना महमूद अली (Mahmood Ali) यांच्यावर टीका केली आहे, तसेच लोकांनी आपला संतापदेखील व्यक्त केला आहे.