mahesh gaikwad – उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
घटनेनंतर ठाणे जिल्हा हादरला आहे. उल्हासनगरसह कल्याणमध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले आहे. मिळलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांचं निवासी परिसरात तसेच कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.
या घटनेमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी कल्याण पूर्व परिसरात बंदची हाक दिली आहे. माजी नगरसेवक, कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या कार्यालयासह घराजवळही पोलिसांचा फौजफाटा असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आलं आहे. उल्हासनगरच नव्हे तर कल्याणमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच गोळीबाराचा निषेध करत कल्याण पूर्व येथे दुकाने बंद करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाकडून निषेध करण्याचे आव्हान केल्यानंतर ही दुकाने बंद ठेवण्यात आली.