पुणे – ट्रान्सफॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त करण्यासाठी अथवा नवीन ट्रान्सफॉर्मर त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या अॅपचा वापर करून खबर द्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. यामुळे खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात बिघडलेला ट्रान्सफॉर्मर बदलला जात आहे. तथापि, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी महावितरणच्या मोबाईल ऍपवरील सुविधा वापरणे ग्राहकांसाठी सोपे ठरू शकते. सविस्तर माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.