Ranka Jewellers : १४५ वर्षांची परंपरा व आजपर्यंत जोपासलेला प्रामाणिकपणा, सचोटी, ग्राहकांचा विश्वास, उत्तम सेवा व जपलेली शुद्धता यामुळे रांका ज्वेलर्सने जनतेच्या मनात व हृदयात आगळेवेगळे प्रतिष्ठेचे स्थान निर्माण केले आहे. लग्नसराईनिमित्त रांका ज्वेलर्सने नुकतेच ‘विवाहारंभ लाऊंज’मध्ये अनेकविध दागिन्यांची मोठी श्रृंखला ग्राहकांच्या सेवेत सादर केली असून, त्यास ग्राहकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळत आहे.
साडे तीन मुहूर्तापैकी एक व हिंदू नववर्षातील पहिला शुभमुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने व चांदी रूपात लक्ष्मी घरी आणण्याची परंपरा लक्षात घेऊन ग्राहकांना कमी खर्चात सोने चांदीचे दागिने घरी आणण्यासाठी सुंदर योजना रांका ज्वेलर्सने सादर केली आहे.
सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २५% सूट, हिरे व जडाऊ दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% सूट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हॉलमार्क केलेले दागिने बदलून नवीन दागिने करण्यासाठी १००% एक्सचेंज ऑफर म्हणजेच कोणतीही घट / झळ न घेता बदलून देण्यात येईल. त्यासाठी फक्त मजुरी द्यावी लागेल. या खास योजना दि. ६ एप्रिल ते १० मे २०२४ पर्यंत रांका ज्वेलर्सच्या सर्व दालनांमध्ये उपलब्ध आहेत.
रांका परिवारातील सातवी पिढी या व्यवसायामध्ये अग्रेसररित्या कार्यरत आहे. सातवी पिढी व्यवसायात असणारी रांका ज्वेलर्स ही पुण्यातील एकमेव सराफी पेढी आहे. सातव्या पिढीतील मेकॅनिकल इंजीनिअर (USA) ऋषभ रांका यांनी १ वर्षापूर्वी आपल्या नव्या संकल्पनेतून खराडी येथे सुरू केलेले सुवर्णदालन यंदा आपला प्रथम वर्धापनदिन साजरा करीत असून,
ऋषभ रांका यांनी आपल्या दालनात जुन्या व नव्या परंपरेच्या डिझाईन्सच्या दागिन्यांचा संगम साधल्यामुळे अनेक ग्राहकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार व त्यांच्या मागणीप्रमाणे कस्टमाईज्ड ज्वेलरी तयारी करून देण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे ऋषभ रांका यांनी त्या परिसरातील असंख्य ग्राहकांची मने जिंकून घेतली आहेत.
रांका ज्वेलर्स हे नेहमी बदलत्या काळाप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन्सचे, जास्त व कमी वजनाचे, सुबक व मनमोहक दागिने सादर करण्यात प्रसिद्ध असून अग्रेसर आहेत, त्यामुळेच भारतातील अनेक नामांकित संस्थांनी रांका ज्वेलर्स यांचा मानसन्मान केला आहे. रांका ज्वेलर्स यांनी तरुण पिढीसाठी क्रांतीनारी या अत्यंत आधुनिक अशा डिझाईन्सच्या चांदीच्या दागिन्यांची श्रृंखला सादर केली असून या दागिन्यांस तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
रांका ज्वेलर्सने खास गुढीपाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी सादर केलेली सवलतीची योजना पुणे शहरातील रविवार पेठ, लक्ष्मी रोड, कर्वे रोड, पिंपरी-चिंचवड, हडपसर, सिंहगड रोड, पुणे-सातारा रोड, बंडगार्डन, बाणेर, पिंपळे सौदागर, कोंढवा आणि खराडी अशा एकूण १२ दालनांमध्ये उपलब्ध आहे. रांका परिवारातर्फे सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत असतानाच १३ मे रोजी होणार्या निवडणुकीत आपण सर्वांनी जरुर मतदान करावे, असे आवाहन फतेचंद रांका यांनी केले आहे