पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागाला फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा करणारी महात्मा फुले मंडई आजपासून सुरू करण्यात येणार होती. व्यापाऱ्यांनी सर्व तयारीही केली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव रात्री उशिराने पोलिसांनी परवानगी नाकारली.
सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत आवारातील फळभाज्या, पालेभाज्या, कांदा-बटाटा, फळबाजार सुरू राहणार असून सोशल डिस्टसिंगची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार होती. त्यानंतर, त्यांना खरेदीसाठी सोडण्यात येणार असल्याचे अखिल मंडई शेतीमाल संघटनेचे अध्यक्ष राजू कासुर्डे यांनी सांगितले होते. मात्र, हा भाग सील करण्यात आल्याने पोलिसांनी रात्री उशिराने परवानगी नाकारली.
दरम्यान, शहराला फळे व भाजीपाल्याचा पुरवठा करणारा मार्केटयार्डातील घाऊक बाजार बंद आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मंडई बंद आहे. तसेच किरकोळ बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. किरकोळ विक्रेत्यांना घाऊक स्वरुपात माल मागवून त्याची विक्री करणे शक्य नव्हते.