राजगुरूनगर -मंदोशी (ता. खेड) येथील नुकसानग्रस्त नागरिकांना खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 35 घरांच्या छपरांसाठी पत्रे आणि आर्थिक सहाय्य दिले. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नुकसानग्रस्त कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक किराणा साहित्य पाठवून दिले.
बाजार समिती सभापती, संचालक यांना मदत करण्याचे आवाहन केले. सभापती विनायक घुमटकर, माजी सभापती अरुण चांभारे, उपसभापती विठ्ठल वनघरे, सुजाता पचपिंड यांनी मंदोशीत जाऊन नुकसानीची माहिती घेतली.