मुंबई :- शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याबाबत केेेेेेेलेल्या वक्तव्याची महाराष्ट्रभर चर्चा होतेय. शिवाय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यांनीही त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विधानाने केवळ आमदार आदिती तटकरे यांचाच अपमान झाला नाही तर राज्यातील ६ कोटीपेक्षा अधिक महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध! अशा शब्दात रोहित पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, शरद पवार याांनी महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान सधी दिली. याचा नेहमीच अभिमान वाटतो, पण समानतेची शिकवण देणाऱ्या, संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी असं बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांंनी केला आहे.
काय म्हणाले आमदार गोगावले….
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा करताना आमदार भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांचा उल्लेख केला. पण तो दावा करत असताना गोगावलेंची जीभ घसरली आहे.
आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं तरी मी त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुषात काही फरक आहे की नाही?, असं अजब वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे.