मुंबई :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची शिवसेनेत ‘नेता’ म्हणून नियुक्ती केली. या संघटनेत पक्षाध्यक्षानंतर ज्येष्ठ नेत्यांना हे पद दिले जाते.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्तावही सत्तारूढ गटाने मागे घेतला आहे. भाजपचे प्रविण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता पण हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे.
तत्पूर्वी, शुक्रवारी येथे झालेल्या अधिकृत सभेत बोलताना गोऱ्हे यांनी शिंदे सरकारच्या कार्याचा गौरव केला होता.
एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिवसेना योग्य दिशेने वाटचाल करत आहे त्यामुळे आपण त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले होते. ठाकरे गटाच्या नेत्यांनी मात्र नीलम गोऱ्हे यांच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे.