मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यावर विशेष भर दिला असून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली आहे. यंदा राज्य सरकारने आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच कर्करोग व्हॅनसाठी 8 कोटींची तरतूद केली आहे.
तसेच हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड आदी 16 जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी महिला स्पेशल हॉस्पिटलची घोषणा करताच सभागृहातील सदस्यांनी टेबल वाजवून त्याचे स्वागत केले.
अर्थसंकल्पातील इतर महत्वाच्या घोषणा..
शिक्षणसंबंधित क्षेत्रासाठी अजित पवारांनी नेमक्या काय काय घोषणा केल्या…
-उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद
-शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद
-मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
-सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद
-क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद
-अजित पवारांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा
-शेततळ्यांना आता 75 हजारांचे अनुदान देणार
-मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
-60 हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
-गोसीखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी रूपये उपलब्ध करून देणार
-महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे.
-कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
-कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर देणार
-बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार
-हळद संशोधन 100 कोटी
-विदर्भ आणि मराठवाडा सोयाबीन केंद्र, 3 वर्षात 1 हजार कोटी खर्च करणार
-मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना राबवण्यात येणार आहे
-कोकण कृषी आणि वसंतराव नाईक विद्यापीठांना 50 वर्ष पूर्ण होणार असल्याने 50 कोटींचा निधी
-कृषी निर्यात धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
-हवेलीत संभाजीराजेंचं स्मारक उभारणार