मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यात इंधन दरवाढीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कारण राज्य सरकार CNG वरचा टॅक्स 13.5 टक्यांवरुन 3 टक्यावर करणार आहे. यामुळे सीएनजीच्या किंमतीत घट होणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा सुरु असताना राज्यातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
अर्थसंकल्पातील इतर महत्वाच्या घोषणा..
शिक्षणसंबंधित क्षेत्रासाठी अजित पवारांनी नेमक्या काय काय घोषणा केल्या…
-उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद
-शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद
-मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
-सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद
-क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद
-अजित पवारांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा
-शेततळ्यांना आता 75 हजारांचे अनुदान देणार
-मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
-60 हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
-गोसीखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी रूपये उपलब्ध करून देणार
-महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे.
-कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
-कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर देणार
-बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार
-हळद संशोधन 100 कोटी
-विदर्भ आणि मराठवाडा सोयाबीन केंद्र, 3 वर्षात 1 हजार कोटी खर्च करणार
-मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना राबवण्यात येणार आहे
-कोकण कृषी आणि वसंतराव नाईक विद्यापीठांना 50 वर्ष पूर्ण होणार असल्याने 50 कोटींचा निधी
-कृषी निर्यात धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
-हवेलीत संभाजीराजेंचं स्मारक उभारणार