अशी सेवा देणारी राज्यातील पहिलीच पतसंस्था ठरली
सासवड – वीज ग्राहकांना सुलभ आणि सुरळीत सेवा मिळण्यासाठी सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये महावितरणच्या “महापॉवर पे ई वॉलेट’ सुविधा सुरू झाली आहे. अशा प्रकारे सुविधा देणारी पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था राज्यातील पहिली पतसंस्था ठरली आहे.
पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव होळकर यांच्या हस्ते या सुविधेचा शनिवारी (दि. 29) शुभारंभ झाला. या “महापॉवर पे ई वॉलेट’ सुविधेमध्ये एका परवान्यावर पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेला 99 ठिकाणी वीज बिल भरणा केंद्र सुरू करता येणार आहेत.
सर्वप्रथम पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणा होणार आहे.
यावेळी जिल्ह परिषदेचे माजी सदस्य सुदामराव इंगळे, नीरा बाजार समितीचे सभापती शरद जगताप, उपसभापती महादेव टिळेकर, पुरंदर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, संचालक अंकुश जगताप, आनंद घोरपडे, डॉ. विनायक खाडे, नंदकुमार जगताप, प्रदीप पोमण, गणेश जगताप, बाजार समितीचे संचालक देविदास कामथे, संदीप फडतरे, अशोक निगडे, अनिल माने, राजकुमार शहा, बाळासाहेब जगदाळे,
वामन कामठे, भाऊसाहेब गुलदगड, विक्रम दगडे, पंकज निलाखे, बाळासाहेब शिंदे, सुशांत कांबळे, संचालिका शहाजान शेख, मनिषा नाझीरकर, शरयू वाबळे, पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, व्यवस्थापक सतीश शिंदे, हरीभाऊ शिंदे, भाऊसाहेब कापरे, माजी सभापती विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाणे, माऊली वचकल, महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, उपकार्यकारी अभियंता गणेश चांदणे, शाखा अभियंता विजय डॉमर्स आदी उपस्थित होते.
सकाळी 10 ते सायंकाळी 6
ग्राहकांना पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत वीज बिल भरणा करता येणार आहे. त्यामुळे ठराविक वेळेचे बंधन राहणार नाही व ग्राहकांना तात्काळ विज बिल भरल्याची पावती व भ्रमणध्वनीवर संदेश मिळणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संचालक डॉ. खाडे यांनी दिली.