आंबेगाव तालुका प्रभारी प्रमुखपदी संतोष डोके
मंचर – “गाव तेथे शिवसेना’ शाखेचा बोर्ड लावण्याचा निश्चिय करण्यात आला आहे. त्यातचबरोबर शिवसेना उपतालुकाप्रमुख
संतोष डोके यांच्यावर प्रभारी आंबेगाव तालुकाप्रमुख पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
आंबेगाव तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लांडेवाडी ता.आंबेगाव येथे शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, त्यावेळी वरील निर्णय घोषित करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, जिल्हासल्लागार रवींद्र करंजखेले, युवासेना शिरुरलोकसभा अध्यक्ष सचिन बांगर, युवासेना जिल्हाध्यक्ष प्रवीण थोरात, तालुकासंघटक राजाभाऊ काळे, शिवाजी राजगुरू, अशोक थोरात, मिलींद काळे, विश्वास लोहोट, अमोल अंकुश, हरी आवटे, संजय चासकर, रामदास जाधव, वासुदेव भालेराव, तुकाराम काळे, मनोज काळे, योगेश बाणखेले, धनेशमोरडे, खंडू खंडागळे, स्वप्निल बेंडे, प्रवीण कोळेकर, प्रदीप घोडेकर, माऊली लोखंडे आदी उपस्थित होते.
“शासन आपल्या दारी’ या राज्य शासनाच्या अभिनव उपक्रमाची विस्तृत माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी मेहनत घेण्याचे अवाहन आढळराव पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्यात गावागावांत “गाव तेथे शिवसेना फलक’ लावण्याचा निर्णय होऊन पहिल्या टप्प्यात मंचरपासून भीमाशंकरपर्यंत शिवसेना फलक लावण्याचे धोरण निश्चित झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या माध्यमातून शिरूर लोकसभेत मोठया प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. या कामांची माहिती जनतेपर्यंत जाणे आवश्यक आहे. पक्षसंघटना बळकटीसाठी पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊन शिवसैनिकांशीसंपर्क साधावा, त्या त्या भागातील जनतेच्या अडी-अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार