बारामती – विद्युत टॉवर लाईन पाडून महावितरण कंपनीचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान केलेल्या आरोपातून दोन आरोपींची येथील जिल्हा न्यायाधीश दरेकर यांनी निर्दोष मुक्तता केली.
पाटस (ता. दौंड) हद्दीमध्ये २०२१ मध्ये आरोपी प्रदीप माणिक खारतोडे व संजय बापूराव गाढवे यांनी महावितरण कंपनीच्या टावर लाईनचे तीन टावर गॅस कटरने कापून सदर शासकीय सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. बाबत व विद्युत कलम च्या वेगवेगळ्या कलमान्वये आरोपीविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे झाला होता.
सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी यांच्याविरुद्ध न्यायालयात कोणताही सबळ पुरावा न मिळाल्यामुळे व आरोपींचे वकील ॲड. प्रसाद खारतोडे यांनी केवळ आरोपी हे सामाजिक आंदोलनामध्ये अग्रेसर असल्यामुळे आरोपींवर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा युक्तिवाद केल्यामुळे बारामती येथील जिल्हा न्यायाधीश दरेकर यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर गुन्हे कामी ॲड. प्रीती शिंदे – निंबाळकर, संदीप येडे, संतोष येडे, आनिष शिंदे यांनी काम पाहिले.