महाळुंगे इंगळे, (वार्ताहर) – महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मागील 15 दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी आणि प्रभारी अधिकार्यां विना कामकाज चालवण्याची वेळ आली आहे.
खरे पाहिलं तर महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाणे हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस ठाणे आहे. येथे मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्याचप्रमाणे गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत दररोज चोरी, दरोडे, खून असे गुन्ह्यांची नोंद दिवसेंदिवस वाढतच आहे.
असे असताना देखील पोलीस प्रशासनाकडून संबंधित पोलीस ठाण्याला वार्यावर सोडून देण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांची गेले 15 दिवसांपूर्वीवी बदली झाली त्यानंतर दोन दिवसांपूर्वी क्राईम पोलीस निरीक्षक कसबेची देखील उचल बांगडी करण्यात आली त्यामुळे या पोलीस ठाण्याला कोणी वाली उरला नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.