नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील पोलीस स्टेशनची महिला दक्षता कमिटी, ग्रामपंचायत तंटा समितीवर वकील प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या माधवी पोटे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल सामाजिक व राजकीय स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
जुन्नर तालुका वकीलबार असोसिएशन आणि नारायणगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. अॅड. माधवी पोटे यांनी वयाच्या 40 व्या वर्षी बीकॉम, एलएलबी, जीडीसी अॅन्ड ए शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या निवडीबद्दल श्रीराम मित्र मंडळ, श्रीराम पतसंस्था, काशी विश्वेश्वर मंडळ, हनुमान चौक आणि तुळजाभवानी ग्रामीण बिगर शेती महिला पतसंस्थेने गौरव केला.
माधवी पोटे सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि तुळजाभवानी ग्रामीण महिला पतसंस्थेच्या कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत असून जुन्नर वकील बार असोसिएशनच्या माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.