भोपाळ – मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) अनेक ठिकाणी तुफानी पाऊस (rain) झाला आहे त्यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी रविवारी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीदरम्यान पूर मदत कार्यासाठी आवश्यक असल्यास लष्कर आणि हवाई दलालाही पाचारण करण्यात येईल.
मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी त्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक घेतली आणि त्यांना या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशी सज्जता ठेवण्याच्या सुचना केल्या.
मुख्यमंत्र्यांनी खरगोन, बरवानी, धार, खांडवा, बुरहानपूर, अलीराजपूर आणि इंदूरमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परिस्थिती नियंत्रणात आहे.
आणि राज्य आपत्ती आपत्कालीन प्रतिसाद दल आणि एनडीआरएफच्या तुकड्या या भागात काम करत आहेत. तथापि आता बाधित भागात पाणी ओसरू लागले आहे.
लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गरज पडल्यास लष्कर आणि हवाई दलालाही पाचारण करण्यात येईल,मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.