Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final : आशिया कप 2023 च्या विजेतेपदाचा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला हे विजेतेपद जिंकून आपली तयारी मजबूत करायची आहे. कोणत्याही बहुराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध भारताचा विक्रमही उत्कृष्ट राहिला आहे. अशा स्थितीत दासून शनाका संघाला भारतीय संघावर मात करणे सोपे जाणार नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2023 च्या अंतिम लढतीत नाणेफेकीचा (Toss) कौल हा श्रीलंकेच्या बाजूनं लागला आहे. (SRI LANKA won the toss and elected to bat)कर्णधार दासून शनाका याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेचेे सहा फलंदाज 5.4 षटकात अवघ्या 12 धावांवर तंबूत परतले आहेत. यापैकी सिराजने पाच बळी तर बूमराह याने 1 बळी घेतला आहेे. सिराजने पहिल्यांदाच वनडेत पाच विकेट्स घेतल्या आहेत. सध्या दुनिथ वेलालगे आणि कुसल मेंडिस क्रीजवर आहेत.
श्रीलंकेला सहाव्या षटकात 12 धावांवर सहावा धक्का बसला. सिराजने कर्णधार दासुन शनाकाला क्लीन बोल्ड करत तंबूत धाङलं. त्याला खातेही उघडता आले नाही. याआधी सिराजने चौथ्या षटकात सहा चेंडूत चार बळी घेतले. प्रथम, त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. निसांकाला चार चेंडूत दोन धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा एलबीडब्ल्यू आऊट केलं. चौथ्या चेंडूवर सिराजनं चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र, त्याची हॅटट्रिक हुकली.
पाचव्या चेंडूवर चौकार गेला. यानंतर अखेरच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. निसांकाला दोन तर धनंजयला चार धावा करता आल्या. त्याचवेळी समरविक्रमा आणि असलंका यांना खातेही उघडता आले नाही. तत्पूर्वी, बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले होते. परेराला खातेही उघडता आले नाही.
दरम्यान, वनडे असो वा टी-20, आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका सात वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने चार सामने जिंकले, तर श्रीलंकेने तीन फायनल जिंकल्या.अंतिम फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही आठवी वेळ आहे. यापूर्वी 1988 आशिया चषक, 1990/91 आशिया चषक, 1995 आशिया चषक, 1997 आशिया चषक, 2004 आशिया चषक, 2008 आशिया कप, 2010 आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत.