पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि बिलियर्डस अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत माधव जोशी याने आपली विजयी मालिका कायम ठेवत बाद फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत डबल एलिमनेशन फेरीत पुण्याच्या माधव जोशीने मुंबईच्या कुमार गटातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या शयान राझमीचा 4-0 (40-32, 31-19, 35-23, 32-18) असा एकतर्फी पराभव करून सलग तिसऱ्या विजयासह बाद फेरीत धडक मारली.
26 वर्षीय माधव हा कॉर्नर पॉकेट येथे सराव करतो. मुंबईच्या सुमित सालदुलकर याने आपला शहर सहकारी आदित्य शांडिल्याचा 4-3 (16-31, 19-37, 50-23, 41-05, 24-55, 44-16, 34-14) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजयी सलामी दिली.
अभिषेक बोराने कुणाल वासवानीचा 4-0 (42-04, 48-00, 33-02, 39-09) असा सहज पराभव केला. योगेश शर्माने सलील देशपांडेला 4-1 (32-17, 50-08, 22-29, 39-01, 42-11) असे पराभूत केले.