बॉलीवूडचा माचो मॅन जॉन अब्राहम हा वैविध्यपूर्ण भूमिकांबाबत ओळखला जातो. त्याच्या खात्यावर असणाऱ्या चित्रपटांची संख्या कमी असली तरी याचे कारण त्याचा चोखंदळपणा असल्याचे सांगितले जाते. केवळ आपली व्यक्तिरेखाच नव्हे तर कथानकही दमदार असेल तरच जॉन चित्रपट स्वीकारतो.
आपल्या कारकिर्दीत जॉनने अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांनी-समीक्षकांनी त्याची प्रशंसाही केली आहे. जॉनला आता वेगळ्या धाटणीच्या सशक्त कथानकावर काम करायचे आहे.
बॉलीवूडमध्ये सध्याच्या काळात रुढ झालेला “कबीर सिंह” ट्रेंड त्याला पसंत नाही. दक्षिणेकडील सुपरहिट चित्रपटांचे हिंदी रिमेक करण्यात धन्यता मानणाऱ्यांमध्ये मी नाही. माझ्या कल्पना चित्रपटाच्या बजेटपेक्षा मोठ्या असतात, असे तो सांगतो.
त्यामुळेच मी माझ्या बुद्धीला पटतील अशा एखाद्या कथानकाच्या शोधात आहे, असे जॉन म्हणतो. बघूया येणाऱ्या वर्षात अशा एखाद्या चित्रपटात जॉन झळकतो का?