मुंबई: भारताचा टेनिस स्टार प्रज्ञेश गुणेश्वरन, सुमित नागल, रामकुमार रामनाथन व साकेत मायनेनी एमएसएलटीए व पीएमडीटीए आयोजित आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेने होणाऱ्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
म्हाळुंगे- बालेवाडी टेनिस संकुलामध्ये येत्या 11 ते 17 नोव्हेंबरदरम्यान सलग सहाव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी देशात होणारी ही एकमेव चॅलेंजर स्पर्धा असल्याने खेळाडूंसाठी विशेष महत्त्वाची आहे. जवळपास 20 देशातील स्पर्धक यात सहभाग नोंदवतील. या स्पर्धेतून भारतीय टेनिसपटूंना एटीपी गुणांची कमाई करता येते.
यावर्षी क्रमवारीनुसार सात भारतीय खेळाडू हे मुख्य फेरीत आहेत. यासोबतच मुख्य फेरीत चार वाईल्ड कार्ड प्रवेश देखील असतील. या स्पर्धेचे आयोजन हे अशा पद्धतीने होते की विजेत्याला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत पोहचू इच्छिणा-या खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. काही चॅलेंजर स्पर्धा शिल्लक असल्याने अनेक चांगल्या खेळाडूंचा प्रयत्न वर्षाचा शेवट विजयाने करण्याचा असेल.तर, काही जणांचा प्रयत्न महाराष्ट्र ओपन
स्पर्धेची तयारी करण्याचा असेल. जी याच ठिकाणी होणार आहे. गेल्या पाच वर्षात विजेत्या खेळाडूला अव्वल 100 जणांमध्ये जाण्यास मदत मिळाली होती. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आणखी लोकप्रिय होत आहे. नवीन 48 ड्रॉ च्या फॉरमॅटमुळे यावर्षीची कट ऑफ ही 550 अशी होती. एटीपी चॅलेंजर स्पर्धेमध्ये सातत्यता आम्ही ठेवली आहे व आम्ही आनंदी आहोत. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळाडूंविरुद्ध घरच्या वातावरणात खेळण्यास मिळते. या स्पर्धेसाठी रोलॅंड हर्फेल यांची सुपरवायजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर, शीतल अय्यर या एटीपी रेफ्री असतील.पात्रता फेरीसाठी फक्त दोन सामने असतील व ते मुख्य फेरीसोबतच 11 नोव्हेंबरला खेळविण्यात येतील.
स्पर्धेचा अंतिम सामना 17 नोव्हेंबर रविवारी खेळवला जाईल. केपीआयटी पुरुष चॅलेंजर विजेत्यास 7200 डॉलर्स (5,10,000 रुपये) आणि 80 एटीपी गुण तर, उपविजेत्यास 4240 डॉलर्स (3,00,000 रुपये) व 48 एटीपी गुण मिळतील.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
अंतिम फेरी- मुले : यशराज दळवी (5) वि.वि. दक्ष अगरवाल 7-6 (12-10), 6-3; मुली – वैष्णवी आडकर (4) वि.वि. बेला ताम्हणकर(3)0-6, 6-2, 7-5; दुहेरी गट – अंतिम फेरी – मुले जितीन छेत्री/भूपेंदर दहिया (2) वि.वि. सिद्धार्थ मराठे/अंशुल सातव 6-3, 6-1; मुली – बेला ताम्हणकर/प्रेरणा विचारे (1)वि.वि. राधिका महाजन/वैष्णवी आडकर (3) 6-3, 2-6, 10-6.