मुंबई – अभिनेता अनिल कपूर बॉलीवूडमध्ये आजही 66 व्या वर्षी दमदार काम करत आहेत. नुकतेच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये 40 वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त त्यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. विविध भूमिकांद्वारे त्यांनी अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
अनिल कपूर यांनी 1983 साली ‘वो सात दिन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाची क्लिप शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘आज मी एक अभिनेता आणि मनोरंजनकर्ता म्हणून 40 वर्षे पूर्ण करत आहे. आतापर्यंत प्रेक्षकांकडून मला खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. मी जिथे आहे तेच मला करायचे आहे आणि हेच कायम करत राहायचं आहे. मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांनी मदत केली आहे, पण विशेषत: माझा भाऊ स्वर्गीय बापूसाहेब, बोनी कपूर आणि त्यांचे वडील सुरिंदर कपूर यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ‘वो सात दिन’ मध्ये काम करण्याची संधी दिली. यानिमित मी त्यांचे आभार मानतो.’
पुढे अनिल कपूर यांनी लिहिले की, ‘नसीरुद्दीन शाह आणि पद्मिनी कोल्हापुरी यांचाही मी नेहमीच आभारी राहीन, ज्यांनी मला नव्याने संधी दिली. त्याच्या स्टारडमने मला अपेक्षेपेक्षा जास्त चकित केले. आज मी जे काही आहे ते या दिग्गजांमुळेच… तुमच्या सर्वांकडून मिळालेल्या प्रेमाचा मी ऋणी राहीन. 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी तुमच्यासाठी ‘द नाईट मॅनेजर भाग 2’ आणि ‘अॅनिमल’ हे दोन खास चित्रपट घेऊन येत आहे. आशा आहे की तुम्ही मला नेहमीप्रमाणे प्रेम आणि पाठिंबा देताल.’
https://www.instagram.com/reel/Ct1LF92x_Bk/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, अनिल कपूर लवकरच ‘द नाईट मॅनेजर पार्ट 2’ मध्ये आदित्य रॉय कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याचबरोबर ते रणबीर कपूरसोबत ‘अॅनिमल’ मध्येही दिसणार आहे.