Lok Sabha Election 2024 Second Phase Voting: देशभरातील 21 राज्यांमध्ये लोकसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पा आज संपला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 54.85 टक्के मतदान झाले आहे. सहा वाजता मतदान केंद्रांवर प्रवेश बंद करण्यात आला.
18 व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी देशात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमध्ये एकूण 89 जागांसाठी मतदान होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पूर्ण होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
Update at 1300 hrs : Polls are by and large peaceful across States/UTs
– Voters show great enthusiasm, as polling reaches halfway mark
– Substantial voter turnout reported in States/UTs as at 1300 hrs
Photos/video courtesy : CEOs/PIBshttps://t.co/LOz8TZT72p pic.twitter.com/e9xqhdsdPQ
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) April 19, 2024
28 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली –
लोकसभा निवडणुकीसोबतच देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होत आहेत. पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशातील 60 आणि सिक्कीममधील 32 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडले. त्याचवेळी चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने 28 मार्च रोजी अधिसूचना जारी केली होती. दुसऱ्या टप्प्यासाठी या 13 राज्यांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल होती. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात कोणत्या राज्यात किती जागा आहेत पहा –
आसाम 5, बिहार 5, छत्तीसगड 3, कर्नाटक 14, केरळ 20, मध्यप्रदेश7, महाराष्ट्र 8, मणिपूर 1, त्रिपुरा 1, जम्मू काश्मीर 1, राजस्थान 13, उत्तर प्रदेश 8, पश्चिम बंगाल 3, जागांवर मतदान पार पडणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये सर्वाधिक 20 जागांवर मतदान होणार –
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या टप्प्यात केरळमध्ये 20 जागांवर निवडणूक होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या 13 राज्यांमध्ये ईव्हीएम, सुरक्षा आणि इतर संसाधनांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळ व्यतिरिक्त कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, बिहारमधील 5 आणि छत्तीसगडमधील 3 जागांवर मतदान होणार आहे.
Commission led by CEC Rajiv Kumar and ECs Gyanesh Kumar and Sukhbir Singh Sandhu monitoring the progress of polling in Phase 1 of #GeneralElections2024 at ECI Headquarters in Nirvachan Sadan today pic.twitter.com/rfnAHzCms4
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) April 19, 2024
महाराष्ट्रात या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान –
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी –
पश्चिम बंगाल: 77.57%
त्रिपुरा: 76.10%
पुडुचेरी: 72.84%
आसाम: 70.77%
अरुणाचल प्रदेश: 63.26%
अंदमान आणि निकोबार: 56.87%
बिहार: 46.32%
उत्तर प्रदेश: 57.54%
उत्तराखंड: 53.56%
छत्तीसगड: 63.41%
जम्मू आणि काश्मीर: 65.08%
लक्षद्वीप: 59.02%
मध्य प्रदेश: 63.25%
महाराष्ट्र: 54.85%
मणिपूर: 67.46%
मेघालय: 69.91%
मिझोरम: 52.62%
नागालँड: 55.75%
राजस्थान: ५०.२७%
सिक्कीम: 67.58%
तामिळनाडू: 62.02%