IPL 2024, Live Cricket Score (LSG vs CSK Match 34) : आयपीएल 2024 चा 34 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर आज (शुक्रवार, 19 एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल याच्याकडे लखनौ सुपर जायंट्सचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपरजायंट्सच्या बाजूनं लागला आहे. लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. या सामन्यासाठी लखनऊने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले आहे. सीएसकेने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे, तर डेरिल मिशेलला बाहेर ठेवण्यात आले आहे.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants win the toss and elect to bowl against Chennai Super Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/PpXrbLNaDm#TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/DS00GIitd2
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2024
LSG vs CSK Live : दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालील प्रमाणे…
लखनौ सुपरजायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.
इम्पॅक्ट सब : अर्शीन कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, युधवीर सिंग, मणिरामन सिद्धार्थ, अर्शद खान.
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवन दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथीराना.
इम्पॅक्ट सब : समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर
दरम्यान, आतापर्यंत या स्पर्धेत दोन्ही संघांनी जोरदार दावेदारी केली आहे, त्यामुळे हा सामना रोमांचक होऊ शकतो. एलएसजीने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर तेवढेच सामने गमावले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. रुतुराज गायकवाडचा CSK संघ 8 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईने सलग 2 सामने जिंकलेत. त्यामुळे चेन्नईला आता लखनऊ विरुद्ध विजयी हॅटट्रिकची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौसमोर पराभवाची हॅटट्रिक रोखण्यासाठी चेन्नईवर विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे.