Lok Sabha Election 2024: – भाजपनंतर आज लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह 37 जणांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. (Lok Sabha Election 2024: NCP’s star campaigners include 37 including Ajit Pawar)
लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वपक्षीय श्रेष्टींनी योग्य उमेदवारांच्या तपासाला सुरूवात केली आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही तयारीला सुरूवात केली आहे.
आतापर्यंत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकांसाठी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी शिवाजीराव आढळराव पाटील आणि रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची नावे –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) स्टार प्रचारकांमध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री संजय बनसोडे, अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालूद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,
आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी, आमदार सुनिल टिंगरे, इंद्रनील नाईक, सुनिल शेळके, विक्रम काळे, चेतन तुपे, नितीन पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, दत्ता भारणे, आमदार सतीश चव्हाण, प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी आदींचा समावेश आहे.