Anandrao Adsul | Amravati | Navneet Rana – भाजपकडून अमरावती लोकसभेच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून शिवसेना (शिंदे गट) नेते आनंदराव अडसूळ हे बंड करण्याच्या तयारीत आहेत.
नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यामुळे अडसूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे मी माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. । Anandrao Adsul | Amravati | Navneet Rana
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी रात्री भेट घेत भाजपच्या उमेदवाराला विरोध दर्शविला आहे. या बैठकीत शिंदे यांनी अडसूळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता अडसूळ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अडसूळ म्हणाले, “भाजपने नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी ही राजकीय आत्महत्या आहे. महायुद्धात जपानने हाराकिरी केली. तेच भाजपने केले आहे. सर्व विरोधात असताना कशाच्या जीवावर नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली?
बच्चू कडू यांचाही नवनीत राणा यांना विरोध आहे. तसेच पटेल आणि भाजपचे पदाधिकारीही विरोधात आहे. त्यामुळे राणा यांना तिकीट देणे ही आत्महत्या ठरणार आहे. दरम्यान, 2019 साली आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. । Anandrao Adsul | Amravati | Navneet Rana