Live Cricket Score, RR vs DC Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
पंतचा संघ या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल तर राजस्थानला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्जविरुद्ध पराभव झाला आहे.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. (Delhi Capitals Won the Toss & elected to Field) दुखापतीमुळे गेल्या सामन्यातून बाहेर असलेला इशांत शर्मा या सामन्यात दिसणार नाही. त्याचवेळी शाई होपला पाठीच्या समस्येनेही ग्रासले आहे. या दोघांच्या जागी मुकेश कुमार आणि एनरिक नोर्टजे दिल्लीकडून खेळताना दिसणार आहेत. तर, राजस्थान रॉयल्स कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले गेले आहेत. यापैकी राजस्थानने 14 सामने जिंकले असून दिल्लीने 13 सामने जिंकले आहेत. यावरून सॅमसनच्या संघाचे वर्चस्व दिसून येते.
राजस्थानविरुद्ध दिल्लीची सर्वोच्च धावसंख्या 207 धावा आहे तर सॅमसनच्या संघाची सर्वोच्च धावसंख्या 222 धावा केल्या आहेत. आतापर्यंत राजस्थान रॉयल्सने एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे.