Lok Sabha Election 2024 । भाजपच्या राज्यातील जवळपास १२ खासदारांचा आगामी निवडणुकीतून पत्ता कट होणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपने राज्यातील विद्यमान खासदारांचे पक्षांतर्गत ३ सर्व्हे केले होते.
त्यात डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या खासदारांचा निवडणुकीच्या रिंगणातून पत्ता कट होणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. । Lok Sabha Election 2024
सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून त्यांच्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. उमेदवारी देताना विद्यमान खासदारांनी गत ५ वर्षांत किती प्रभावी कामगिरी केली?
हाच एकमेव निकष डोळ्यांपुढे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या २ दिवसांत भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी येईल तेव्हा त्यात जवळपास डझनभर नावे नवीन असतील. भाजपने राज्यात केलेल्या पक्षांतर्गत सर्व्हेतही जवळपास डझनभर खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. । Lok Sabha Election 2024
यामुळे ही शक्यता वाढली आहे. सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदारांविषयी जनतेत असणारी नाराजी, निवडून येण्याची हमी असणाऱ्या मजबूत उमेदवारांची गरज, ३ पेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या उमेदवारांवर असणारे आक्षेप आदी कारणांमुळे भाजपच्या जवळपास डझनभर विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या मतदार संघांचा समावेश? । Lok Sabha Election 2024
भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत राज्यातील अनेक खासदारांचा स्ट्राईक रेट चांगला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यात नांदेड व बीडसह धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, अहमदनगर दक्षिण, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, वर्धा, रावेर आदी मतदार संघांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्वच मतदार संघांत भाजप कुणाला उमेदवारी देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. । Lok Sabha Election 2024