Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुक देशभरात एकूण सात टप्प्यात पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यातील पहिला टप्यातील मतदान येत्या १९ एप्रिलला होणार आहे. विशेष म्हणजे भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
याकरिता रविवारी १४ एप्रिलपासून नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात घरोघरी मतदानाला सुरुवात झाली असून ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे यांनी घरबसल्या पहिले मतदान करण्याचा मान मिळवला. ८५ वर्षीय वसंत ढोमणे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील डायमंड नगर येथील रहिवासी आहेत. घरबसल्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने इच्छुक मतदारांनी भरलेला फॉर्म १२-डी तयार केला आहे.
दरम्यान, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मतदानाचा लाभ मिळावा यासाठी नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील एकूण २ हजार ३६० मतदार १४ ते १७ एप्रिल या कालावधीत घरून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नागपूरसाठी निवडणूक विभागाकडून १६० टीम तयार करण्यात आल्या आहेत. Lok Sabha Election 2024|
पारदर्शकता जपली जाणार
त्यात ४८० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १०५ टीम तयार करण्यात आल्या असून त्यात ३१५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. घरातून मतदान करताना निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असणार आहेत. तसेच मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे. Lok Sabha Election 2024|
हेही वाचा: