शरद पवार आज साताऱ्यात, ‘त्या’ बॅनरची चर्चा…

सातारा : सातारा लोकसभेचा फिव्हर वाढत चालला आहे. महाविकास आघाडी व इंडीया आघाडीने साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषीत केली आहे. शशिकांत शिंदे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज शरद पवार यांच्या उपस्थितीत भरणार आहेत. शरद पवार हे आज सातार येथे येणार असून ते येण्यापूर्वीच लागलेल्या बॅनरची चर्चा होत आहे.
“मी येतोय तुमचा आशिर्वाद घ्यायला, हवी आहे ती तुमची साथ” असा संदेश असलेले बॅनर साताऱ्यामध्ये ठीक-ठिकाणी लावण्यात आले आहेत.
लोकसभा पोटनिवडणुकांची आठवण
२०१९ मध्ये साताऱ्याची पोटनिवडणूक झाली होती. यावेळी शरद पवार यांची साताऱ्यातील एक सभा विशेष गाजली होती. भर पावसात शरद पवार यांनी केलेलं भाषण या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या पथ्थ्यावर पडल्याचे बोलले जाते.
साताऱ्यातून महायुतीची कोणाला उमेदवारी
महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर करत शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार आज अर्ज भरत आहे तर दुसरीकडे महायुतीने येथील उमेदवार अद्याप जाहीरच केला नाही.
येथून उदयनराजे भोसले लोकसभेसाठी आग्रही आहेत. मात्र जागावाटपामध्ये ही जागा कोणाकडे जाणार हे अद्याप निश्चित झालेल नसल्याने या जागेचा तिढा सुटलेला नाही.महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाल्याने त्यांनी या जागेवर दावा केल्याच बोललं जातंय. याबाबत पुढे काय घडत हे पाहाण महत्वाचं ठरणार आहे.
हे वाचले का ? ‘शाहू महाराजांविरुद्ध 2 लाख 70 हजारापेक्षा जास्त लीडने जिंकणार’ संजय मंडलिकांना विश्वास





