Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीची आज शनिवार घोषणा झाली असून सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग 543 लोकसभा मतदारसंघांसाठीचा कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला. आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत.
देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. मागच्या वेळी लोकसभेला चार टप्प्यांमध्ये निवडणूक झाली होती. महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका होणार आहेत.
26 एप्रिलला मतदान होणार आहे. तसेच 4 जूनला सर्व देशात मतमोजणी होईल. मागच्यावेळी मे महिन्यातच निकाल लागला होता यावेळी निकाल थोडासा उशिरा असणार आहे.
कोणत्या टप्यात कधी निवडणुका होणार : Lok Sabha Election 2024
पहिला टप्पा -19 एप्रिल
दुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 7 मे
सातवा टप्पा – 1 जून
महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होणार : Lok Sabha Election 2024
19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे
देशात 97 कोटी मतदार : Lok Sabha Election 2024
आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
◾पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ